म्हसदी गावात 'तरुण ऐक्य मंडळ' नावाने धान्य सोसायटी होती. हे सर्व तरुण
१९७३ साली दसर्याला शिलंगण खेळण्यासाठी धनदाई देवीच्या मंदिरावर आले
असता, मदिराची दुरावस्था व येणाऱ्या-जाणार््या लोकांचे बोलणे त्यांनी ऐकले. या
मंडळाने या आई धनदाई मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम करण्याचा संकल्प केला.
त्यामंडळाचे सदस्य आर्किटेक्ट श्री.सुधाकर नारायण देवरे यांनी मंदिर बांधण्याचा
प्लॅन दिला. त्याप्रमाणे सर्व सदस्यांनी स्वतःची बैलगाडी, माणूस व स्वत: एक दिवस
अशी आळीपाळीने कामाला सुरुवात केली. दगडी पिलरचे काम पूर्ण झाल्यावर
गावातील व बाहेरगावच्या नोकरदारांकडून देणगी स्वरूपाने पैसा मिळविण्यासाठी ते
स्वतः फिरले. आई धनदाईला कुलदैवत मानणारे नाशिक, जळगाव, धुळे व इतर
ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांनी मोलाचे सहकार्य केले व मंदिराचे काम पूर्ण झाले.
नंतर सभा मंडप, धर्मशाळा, खोल्या, पाण्याची व्यवस्था इ. चांगल्या कामाला मंडळाने
सुरुवात केली. १३/१२/१९९३ रोजी नोंदणी क्र. एफ/ २६१८ या क्रमांकाने ही सस्था
रजिस्टर झाली. मंडळाने भाविकांसाठी दोन पलंग, दोन गाद्या, फॅन, लाईट व सडास-
बाथरूमची व्यवस्था असलेल्या १६ विनामूल्य धर्मशाळा खोल्या बांधल्या. शिवाय
पाण्याची व्यवस्था, गावापासून मंदिरापर्यंत स्ट्रीट लाईट, लग्नकार्यासाठी भांडे, गॅस
सिलेंडर इ. आधुनिक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांना देवीचे शिस्तीत
दर्शन घेता यावे यासाठी रेलिंगची व्यवस्था केली. तसेच, भक्तांना उन्हाचा त्रास होऊ
नये म्हणून पत्र्याची शेड टाकली. लग्नकार्यासाठी ७० ५१०१ चौ.फु. आकाराचे भव्य
मंगल कार्यालय बांधकाम चालू आहे.
धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळ, म्हसदी यांनी पुढील चारवर्षात करावयाची काही महत्त्वाची कामे -
१) मंदिरासमोरील सभामंडप १०५५६० - ६३०० स्क्वे.फु. दुमजली बांधकाम.
२) सभामंडपासमोर स्वागत गेट - दीपस्तंभ उभारणे.
३) मंदिरापासून अर्धा कि.मी. रस्त्यावर ब्लॉक बसविणे.
४) मंदिरपरिसरात पार्किंग झोनसाठी जागा खरेदी करणे.
५) मंदिर परिसरात एक लक्ष लिटर पाण्याची मोठी टाकी तयार करून भाविकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करणे.
६) सौर ऊर्जा प्रकल्प तयार करून २४ तास लाईट व गरम पाण्याची व्यवस्था करणे.
'५) पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आर.ओ. फिल्टरची व्यवस्था करणे.
८) जाऊळ, मानता कार्यक्रमासाठी पत्र्याचे ३०५ १५ साईजचे ५० शेड्स तयार करणे.
९ ) मंदिगच्या संपूर्ण पग्सिगत पेव्हर ब्लॉक बसविणे.
आपला नम्न सेवक
(श्री. हिमतराव दयाराम देवरे)
अध्यक्ष, घनदाई देवी तरुण ऐक्य मडळ, म्हसदी.
संपर्क- ९८२२२०१५२३