श्री धनदाई देवीची आरती

जय जय धनदाई मन रमणी माता
कुलस्वामिनी चौदा भुवांनच स्वामिनी
महिषासुर मर्दिनी जय जय धनदाई ।।१।।

नेसली पातळ हिरवे गार हार शोभे गळा ।
हाती घेऊनिया त्रिशूल भाली कुमकुम टिळा ।
जय जय धनदाई ।।२।।

अंगी ल्यालीसे कुचोळी वर मोत्याची जाळी
हृदयी झळकती पिवळी शोभे ही गळसरी|
जय जय धनदाई ।।३।।

पायी खघागरिया स्वुळसबुळ नाकी मुक्ता-फळ
भाली केशरिया पुरवळ नयनी हे काजळ
जय जय धनदाई ।।४।।

रेड्यावरी या बैसोनि हिंडत रानो - राणी
तुजला नमितो निश - दिनी कुबेर नंदिनी ।
जय जय धनदाई ।।५।।