सिद्धी बुद्धिप्रदे देवी, भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।।
मंत्र, यंत्र, मूर्ती सदा देवि, धनदाई नमोस्तुते ।।
ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांची उपासना करून द्रैत्यानी अनक इच्छित
वर प्राप्त केल्यानंतर दैत्य अर्जिक्य, अत्याचारी बनले. सातपुडा परिसरातील जनतेवर दैत्य अत्याचार करू लागले. त्याच्या
अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी जनतेने आदीशक्तीची करूणा भाकली
भक्तांच्या प्रार्थेला प्रसत्न होऊन धनदाई, सप्तश्रंगी, म्हाळसा, एकक्णि.
चिराई, भटाई, रेणुका अशा या सप्तभगिनींच्या रूपाने आदीशक्ती खानदेशात
अवतरली. या सप्तभगिनींनी दैत्यांना युद्धाचे आव्हान केले. त्यांच्यात घनघोर युद्ध
झाले. त्या युद्धात दैत्य पराभूत झाले आणि वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले.
रेड्याचे रूप घेऊन ठिकठिकाणी जंगलामध्ये लपून बसले. तेव्हा वा
सप्तभगिनी त्यांचा पाठलाग करीत, त्या जंगलात पोहोचल्या व रेड्याच्या
रूपात असलेल्या दैत्यांचा त्यांनी नाश केला. त्या सप्तभगिनींपैकी “घनदाई' ही आदिशक्ती अवतरली व त्याठिकाणी
रेड्याच्या रूपात लपलेल्या दैत्यांचा नाश केला.
कालांतराने भामरेच्या किल्ल्यावर वास्तव्यास असलेले देवरे कुलीन
मराठे गुरे पाळण्याचा व्यवसाय करीत असत. भामरेच्या किल्ल्याचा पाडाव
झाल्यानंतर तेथील सर्व देवरे विखुरले गेले व आज जेथे आदिशक्ती धनदाई
देवीचे मंदिर आहे, त्याठिकाणी वास्तव्यास आले. “नायगांव नावाच्या
गावाची स्थापना केली. त्यांना दृष्टांत मिळाल्यानुसार त्यांनी तेथे
कुलसरक्षणासाठी धनदाई देवीच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली व त्यांच्या
जवळ असलेली सर्व संपत्ती धनदाई देवीची स्थापना करण्यापूर्वी त्याच
ठिकाणी जमिनीत पुरली व त्या वरती धनदाई देवीची स्थापना केली. नायगावात बरीच वर्षे वास्तव्य केल्यानंतर जंगली प्राण्यांचा उपद्रव,
पाण्याची दुर्मिळता तसेच दरोडेखोरांचा त्रास या सर्व गोष्टींना कंटाळून तिथून
जवळच असलेल्या नदी पलीकडील त्याकाळचे 'म्हैसपाडा' म्हणजेच
आजचे 'म्हसदी' याठिकाणी स्थलांतर केले. त्याकाळी पूजा करतांना देवीच्या
मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती. पिढ्यान् पिढ्या देवीच्या मूर्तीला शेंदूर
लावल्यामुळे ती मूर्ती पूर्णत: शेंद्रात गाढली गेली व त्याठिकाणी देवीची मूर्ती
होती हे पुढील पिढ्यांच्या लक्षात देखील आले नाही. कालांतराने हे जागृत
देवस्थान दुर्लक्षित झाले. जंगलात वास्तव्यास असलेले भिल्ल त्या
देवस्थानाचा सांभाळ करू लागले. म्हसदी या गावापासून दीड (१.५) किलोमीटर अंतरावर डोंगरांच्या
पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात आजही हे देवस्थान भक्तीचे प्रतिक म्हणून
उभे आहे.