श्री धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळ, श्री क्षेत्र म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे आमच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत.
कुलस्वामिनी श्री धनदाई माता, म्हसदी
इ.स. १९६४ साली धनदाई देवीने दाखविलेल्या चमत्कारामुळे दर्लक्रित
झालेले हे देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आले. न
ज्याप्रमाणे अस्ताला गेलेला सूर्य पुन्हा उदयास येतो. त्याचप्रमाण २
जागृत देवस्थान पुन्हा उदयास आले. त्याकाळी घडलेला चमत्कार तो असा.
कै. श्री. प्रभाकर मार्तंड कुलकर्णी (लामकानीकर) हे माझे वडील नंदुरबार
येथे पोस्टमन म्हणून काम करीत होते. सौ.प्रमिला प्रभाकर कुलकर्णी ही माझी
आई, नंदुरबार येथे रहात असतांना नाकाच्या, कानाच्या आजाराने त्रस्त होती.
अनेक वैद्य, हकीम ह्यांचा इलाज करूनही गुण येत नव्हता. शिवाय रोज
डोक्यावर भला मोठा दगड घेऊन चालणारी बाई स्वप्नात दिसत होती.
त्यावेळी आई-वडिलांना याचा अर्थ कळत नव्हता असे बरेच दिवस निघून
गेले. आईचा आजार वाढतच होता. स्वप्न पडणे चालू होते.
शेवटी वडिलधाऱ्या लोकांच्या सांगण्यावरून वडील व आई एके दिवशी 'म्हसदी' येथे देवीच्या दर्शनासाठी आले आणि आमच्या आईला पहिला देवीचा संचार झाला. वडील खूप घाबरले होते, काही कळत नव्हते. शेवटी आईसाहेबांनीच स्वत:ची ओळख सांगितली व देवीची सेवा करण्याची आज्ञा दिली. तेव्हापासून आमच्या कुटुंबात देवीचा संचार सुरू झाला. तो आजतागायत पत्नी सौ. हेमलता रमेश कुलकर्णी हिच्या हातून चालू आहे. नंतर आई-वडील नंदुरबार येथे परत आले. स्वप्न पडतच होते. त्यात आता संचारदेखील सुरू झाला होता. संचारात माझ्यावरचा भार कमी करा, मला मोकळे करा, ' असे सांगितले जात होते.

जय श्री धनदाई मातेय नमः
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ॥
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥